आज खूप दिवसांनी मी माझ closet लावायला घेतल. अचानक वरच्या खणात ठेवलेला एक बांगड्याचा बॉक्स हाती लागला. त्यात अगदी सगळ्या रंगांच्या, पद्धतिच्या, आणि विविध size च्या बांगड्या आहेत. तो बॉक्स पाहून मी हरखले. मन अगदी आठवणीच्या राज्यात भरकटत गेले.
त्या बॉक्स मधे अगदी माझ्या बाळ- लेणी असल्यापासून ते आता- आता पर्यन्त वापरत असलेल्या सगळ्या बांगड्या आहेत. जणू काही त्यातली प्रत्येक बांगडी मला काही सांगू पाहत होती. कधी शाळेतल स्नेहसम्मेलनातला कुठलासा नाच तर कधी कुठल्या तरी कार्यक्रमला केलेली एखादी नाटुकली. कधी घरच किंवा आम्हा मैत्रिणीच हळदी कुंकू तर कधी अवाजवी केलेला बांगडी साठीचा हट्ट. कधी स्वतःच पैसे जमवून एखाद्या जत्रेतुन आणलेल्या तर कधी कुठल्या तरी ताईच्या लग्नात भरलेल्या. कधी आत्या-मावशी किंवा काकूला मुद्दामहून आणायला सांगितलेल्या तर कधी त्यांनीच प्रेमाने एखाद्या देवस्थानाहून किंवा नव्या गावाहून आणलेल्या. आपले लाड पूरवणा-यांच्या आठवणीत मन अगदी रमून गेलं.
अचानक एक प्रसंग आठवला. मी घरी हट्ट करीत होते - नव्या बांगडीसाठी. colany मधे कासार आला होता. (तस हे काही नव नव्हत आमच्या घराला, कॉलनीला किंवा अगदी रोज येणा-या त्या कासारालाही.) रडून भोकाड पसरून सगळे प्रकार केलेले. पण घरातले कोणीच तयार होईनात नव्या बांगडीसाठी. तेव्हाच आजीने एक रसरशीत दणका घातला पाठीत आणि तोंडातल्या तोंडात बडबडत राहिली. काहीस असं --' कुठल्या जन्मताल्या हिच्या बांगड्याची हौस राहिलीय काय माहित. रोज बांगडी घेतली तरी हाच तमाशा कासार दिसल्यावर'. शेवटी आजोबानी हतबल होउन हात पकडला आणि म्हणाले चल घेऊ हव्या त्या. पण उगाच दंगा नको. कासार कॉलनी मधून बाहेरच्या रस्त्याला लागलेला. तिथे काही रस्त्यावर राहणा-या मुली त्या कासाराकडे भुकेल्या नजरेने पाहत होत्या. मला काय झाल काय माहित पण आजोबाना मात्र मी promise दिल. आता मी कधी कधी बांगड्यासाठी हट्ट नाही करणार. हो! पण त्यावेळी मात्र घेतल्या होत्या नव्या बांगड्या.
त्या नंतर माझा तो हट्ट सुटला. कदाचित त्या केविल वाण्या चेह-याच्या मुली दिसतील म्हणून. किंवा माझ्या कड़े त्यांना बांगड्या देण्याच औदार्य नव्हत म्हणून. ह्याच नेमक उत्तर मला काही देता येणार नाही. त्या नंतर कधी मी बांगड्या साठी हट्ट केल्याच किमान मला तरी स्मरत नाही, एवढ नक्की. हे सगळ आठवून माझ मला हसूच फुटल.
तो बॉक्स मी बंद करणार तोच, त्यातल्य़ा आजीच्या दोन हिरव्या बांगड्या आणि मोत्याचे तोड़े दृष्टीस पडले. आजोबा जाताना च्या वेळेस तिने काढून ठेवलेले . आणि त्यातच अजून दोन लाल बांगड्या. शेवटला हॉस्पिटल मधे असताना आजीनेच काढून माझ्या हाती दिलेल्या. मी त्या का आणि कधी त्या बॉक्स मधे ठेवल्या - ह्या प्रश्नाला मी स्वत: किंबहुना माझ्या डोळ्यात उभी राहिलेली आसवेही निरुत्तर!