Showing posts with label Wedding Invite. Show all posts
Showing posts with label Wedding Invite. Show all posts

Saturday, December 26, 2015

Poo-Sani Wedding Invite

Other post sitted in drafts for more than year ...

||श्री।।
गजाननाला वंदन करुनी
तुळजाईचे स्मरण करुनी
मंगल खंडोबा मनी स्मरोनी
सद्भावाने निमंत्रितो मुदित मनांनी
"पूर्णिमा" ही जयमाला-जनार्दनची
बहिण लाडकी प्रणालीची
सुहास्यवदना लेक उबाळ्यांची
सोज्वळ -शारदा मुसळ्यांची भाची
"सनिल" सुपुत्र स्वाती-श्यामसुंदर यांचा
वडील बंधू शालाकेचा
बुद्धिवान, नम्र भाचा हा गोलतकरांचा
वर लाभला "पांजरी" कुटुंबियांचा
लग्न-सोहळा निश्चित जाहला
मंगल दिनी '१६ डिसेंबरला'
आनंदाचा घनु बरसला
मोर मनाचा सुखात न्हाला
आप्तेष्टांसह आपण यावे
सहभागी सोहळ्यात व्हावे
सर्वांसंगे सुख वाटावे
वधूवरांना शुभ चिंतावे
स्नेह-परिवार अपुल्या सेवेसी
आत्या -काकांच्या जोडीसी
निमंत्रण आम्ही करितो खांसी
वधू-वरांच्या शुभेछ्चासाठी

Wedding_invite : Ameya and Pranali

It's been more than year this post was in drafts...Finally publishing it.

।।श्री।।


पाहिलं नमन हे, गणेश वंदन ।
तुळजाईसह खंडोबासी , मनोभावे हे निमंत्रण ।
सकळ देवतांसंगे, आपण करावे येथे पाचारण ।।
"प्रणाली" ही जयमाला- जनार्दनची ।
प्रफुल्लिता भाची ही मायेच्या मुसळ्यांची ।
 सृजनशील सुकन्या ही उबाळे परिवाराची ।।
"अमेय" हा वंदना- राजन यांचा ।
विवेकी भाचा हा पितळ्यांचा ।
सुविद्य-सुसंस्कृत  सुपुत्र वर लाभला "पोतदारांचा" ।।
'८ डिसेंबर' मंगल दिनी ।
यावे आपण आनंद चित्ती । 
वधू - वर बंधती विवाह गाठी ।। 
हर्ष आगळा, हा क्षण सुखाचा ।
मेळ होई, येथे दोहों परिवारांचा ।
शुभारंभ होईल, सुखी संसाराचा ।।
बागडे-धुमाळे-लोकरे-वारे ।
आपणांसी निमंत्रिती स्नेही सारे ।
वरद हस्त ठेवण्यांसी, यावे आपण समस्त परिवारासंगे ।।
http://www.mywedding.com/pranaliameya/