Saturday, December 26, 2015

Poo-Sani Wedding Invite

Other post sitted in drafts for more than year ...

||श्री।।
गजाननाला वंदन करुनी
तुळजाईचे स्मरण करुनी
मंगल खंडोबा मनी स्मरोनी
सद्भावाने निमंत्रितो मुदित मनांनी
"पूर्णिमा" ही जयमाला-जनार्दनची
बहिण लाडकी प्रणालीची
सुहास्यवदना लेक उबाळ्यांची
सोज्वळ -शारदा मुसळ्यांची भाची
"सनिल" सुपुत्र स्वाती-श्यामसुंदर यांचा
वडील बंधू शालाकेचा
बुद्धिवान, नम्र भाचा हा गोलतकरांचा
वर लाभला "पांजरी" कुटुंबियांचा
लग्न-सोहळा निश्चित जाहला
मंगल दिनी '१६ डिसेंबरला'
आनंदाचा घनु बरसला
मोर मनाचा सुखात न्हाला
आप्तेष्टांसह आपण यावे
सहभागी सोहळ्यात व्हावे
सर्वांसंगे सुख वाटावे
वधूवरांना शुभ चिंतावे
स्नेह-परिवार अपुल्या सेवेसी
आत्या -काकांच्या जोडीसी
निमंत्रण आम्ही करितो खांसी
वधू-वरांच्या शुभेछ्चासाठी

No comments: