Saturday, November 13, 2010

पोस्टमन

पोस्टमन आणि दिवाळी ह्यांच एक निराळ  नात आहे. (आता ज्यानी पोस्टाची सेवा उपभोगलीच नाही त्याना कदाचित मी काय  बोलतेय ह्याचा अंदाज़ नाही येणार.) दिवाळी निमित्ताने का होईना पण मला ह्या व्यक्तीची आठवण झाली हे काय कमी आहे? 
फार काळ लोटला नाही त्या दिवसाना ज्यावेळी   आपण अगदी आतुरतेने ह्या व्यक्तीची  वाट पाहत असू. सगळ्या सुख दुखा:च्या  बातम्या अगदी निरपेक्ष भावनेने कळवाणारा हा एकमेव प्राणी. पण तुम्ही जर त्याचे नेहमीचे सेवा उपभोकते  असाल  तर तुमची सुख आणि दुख:ही त्याने जाणून घेतल्याशिवाय तो पुढे जाणार नाही हे ही तेवढच खर. पूर्वी आम्ही आवर्जून विशेष दिवासाना ह्या खाकी गणवेश धारकाची  वाट पाहत असू. आता मात्र कलानुरूप आम्हाला आमची पत्रे आमच्या mailbox मधे मिळतात अणि भेटवस्तू एखाद्या तत्सम courier कंपनी कडून.  
 तस पाहील तर अगदीच रटाळ  अशीही पोस्टमनची नोकरी. तरीही आपला जीव ओतून हा पोस्टमन रोज येणारी पत्रे ,तारा ,कधीतरी भेटवस्तू अणि महिन्याच्या सुरुवातीस moneyorders घेऊन येणार. अगदी आता आता पर्यंत आपल्याकडे housing societies मध्ये letter  box  ची सुविधा नव्हती. तर मग पोस्टमन अगदी चार- पाच मजले चढून ती पत्रे , तारा तुमच्यापर्यंत पोहचवणार. कित्येक मैल हा दिवसभर चालणार किंवा cycle हाकणार. सकाळी पहाटे पासून ते सायंकाळ पर्यंत असा हा एकंदरीत परिश्रमाचा दिनक्रम. ह्यातून एखादे पत्र किंवा तार वेळेत नाही पोहचली म्हणजे त्याच्या नोकरीवर गधा आलीच म्हणून समजा. कुठल्याही पत्राच पाकिट फाटू नये ह्याचीही जबाबदारीही  तो घेणार. एकंदरीतच इमाने इतबारे नोकरदारात ह्याची गणती!  
 एरव्ही कुठल्याही सणा दिवशी किंवा खास वेळी तो तुमच्याकडे काहीही मागणार नाही.(मला तर आमच्याकडे नित्य नियमाने येणारया पोस्टमनने  पाणीही मागल्याचे स्मरत नाही. )  पण दिवाळीच्या दिवशी मात्र हक्काने दिवाळी नेण्यासाठी तो येणार. अगदी तुम्ही ओळखणार नाही अशा नवीन कपड्यामध्ये येऊन (पोस्टमन कड़े त्याच्या खाकी कपड्या व्यतिरिक्त काही असू शकते ह्याचे मला तेव्हा खरच नवल वाटे.) तरीही त्यात त्याचा दिवाळी घेण्यावर कसलाही आग्रह नाही. तुम्हाला वाटेल जमेल तशी दिवाळी त्याला दया. तरीही तो खुश. नाही दिलीत म्हणून त्याचा कसलाही त्रागा नाही. दिवाळी नंतर परत तो आपल्या उद्योगाला-  अगदी त्याच आवेशात आणि त्याच निरपेक्ष भावनेने!
  काही कारणानिमित्ताने ह्या दिवाळीच्या  अगदी पहिल्याच दिवशी मी जुनी पत्रे, पोस्टाने आलेल्या भेटवस्तू पाहण्यात मुग्ध झाले. आणि एक सुखद काळ पुन्हा एकदा   अनुभवत होते. अचानक  दारावरची बेल वाजली म्हणून सगळ्या पत्रांची आवारावर करायला घेतली अणि बाहेरून आवाज- "मी पोस्टमन. दिवाळी न्यायला आलोय"  अगदी तशीच मी उठले. डोळ्यांच्या ओल्या कडा  पुसल्या आणि हातात आलेली नोट पोस्टमन काकांच्या हाती दिली. आमचे शेजारीही पाहत बसले ज्या अंकाची  नोट मी पोस्टमन काकाना  दिली अणि बिल्डिंग च्या  पूजेची  वर्गणी  मात्र देताना माझा हात तोकड़ा करते. पण त्याना काय सांगणार ही बिदागी  त्याने मला दिलेल्या एका  सुखद अनुभुतिसाठी  आहे जो कदाचित मला ह्यापुढे मिळणही दूरापास्त  होणार आहे...

   

1 comment:

sid joshi said...

Sometimes something triggers lots of memories unknowingly