Wednesday, February 23, 2011

वा! गुरु

 म्हटलं तर phillosophical आणि म्हटलं तर एक वेगळी अनुभूति म्हणून "वा! गुरु"ची category ठरवता येईल.डॉ.फणसळकरांची कथा ही "Tuesdays With Maurie" ह्या कादंबरीवर आधारीत आहे.
 एक दिलखुलास जगणारा आणि नेहमीच खिलाडू वृत्तीने जगण्याची शिकवणी देणारा प्रोफेसर (डॉ.दिलीप प्रभावळकर) जेव्हा Motor Neuron Disease (MND) ने खंगू लागतो तेव्हा त्याची जीवानावरची उक्तट दृष्टी अधिकच रंगू लगते.
तशातच अतिशय दुर्मिळ आजाराने व्यापलेले म्हणून त्यांची मुलाखत एक TV channel वाले घेतात आणि विद्याधर पै(अतुल परचुरे) नावाचा त्यांचा एक जुना शिष्य ही मुलाखत channel scanning करताना पाहतो.ती पाहत असताना त्याला एक शिष्य म्हणून अतिशय प्रेमळ शिक्षकाची दया तर येतेच पण त्याना भेटण्याचा ध्यासाही लागतो. 
 विद्याधर हे एक advertising agency मधे काम करणार अतिशय busy व्यक्तिमत्त्व. अगदी तुम्हा आम्हाला represent करणारं.ज्याना आयुष्यात खूप काही करायचय
आणि नेमक काम नावाखाली सगळ करताना सुख,प्रेम आणि आयुष्यातल्या अगदी महत्वाच्या अशा किन्तु पैशात किंवा तत्सम materilised यश मोजण्याच्या मापात न बसण्याऱ्या घटना सहजतेने विसरणारा.अगदी स्वत:च लग्नही ह्या गडबडीत postpone करणारा.
त्याच्या दैनंदित कार्यक्रमात काडीचीही ऊसंती नसल्याने आपल्या आवडीच्या गुरुला भेटण म्हणजे कुठला तरी वेळ काढण ह्या गणिता पल्याड  कदाचित पाहूही न शकणाऱ्या व्यक्तितला जेव्हा विद्यार्थी जागा होतो तेव्हा मात्र  गुरुप्रेमापोटी एकदा का होइना - उशीरा का  होइना पण आपण त्याना
भेटण हे जास्त महत्वाच आहे,हे पटल्यावर विद्याधर आपल्या गुरु-भेटीस निघतो.अगदी सगळ काम टाकून!त्या भेटी नंतर त्याचा एक नवा प्रवास आणि आपलाही त्याच्या गुरुंसोबत. 
 मग हा गुरु प्रसंगी त्याला सुख पहायला शिकवतो तर कधी सुख द्यायला.प्रेम पहायला तर कधी अनुभवायला.ह्या सगळ्या प्रवासात गुरु आपल्याला अतिशय सोप्या प्रसंगातून माणसाच क्षणभंगुर आयुष्य अनुभवायला लावतो.एकाच खुर्चीत बसून जणू आपण संपूर्ण प्रवास पूर्ण करतो.ह्या प्रवासात कधी तो बालपण ऊधळतो;
तर कधी यौवनात नाचवतो.तरीही म्हातारपण सुखी असण्याची आस धरवतो."धरत म्हटल तर धरू लागत म्हातारपण..." ही पाडगवाकरांची कविता अगदी योग्य तर्हेने वापरली आहे.पुन्हा एकदा रंगाची उधळण कशी होऊ शकते आणि ती कशी मोहक असू शकते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव गुरु आपल्यासमोर आणतात.    
  मानवाच्या अगदी लहानपणापासून ते म्हातारापणापर्यंत सगळ्यात महत्वाचा टप्पा कुठला तर तो मधला - कारण त्या टप्प्याला ही दोन्ही टोक सावारायची असतात.हा एक सुंदर दृष्टिकोन हा प्रवास पहाताना होतो.सगळ्यात important म्हणजे आपण जगण्यासाठी चालवलेली धडपड ही एक निव्वळ ते जगण सुकर करण्यासाठीची आहे हे विसरता येत नाही- हे गुरु आपल्या डोक्यात अगदी पक्क बसवतात.
 गुरुपत्नी(गिरिजा काट्दरे) तर अगदी मोहावून टाकतात.त्यांची आहे ते स्विकारण्याची प्रगल्ब्धता आणि प्रात्यक्षिक सहजता तर हेल्खावून सोडते.एक सहचारिणी आपल्या सख्याचा दुर्गम प्रवास किती सोपा करू शकते ह्याच हे जिवंत उदाहरण आहे.तिचा role अगदी मोजकाच पण वाखाण्यासारखा  आहे. प्रसंगी गुरुपत्नी आणि प्रेयसी (पूर्णिमा तळवलकर) ह्याना stage वर कमी वाव मिळतो असं वाटत खर;पण नंतर लक्षात येत - जर एवढा मोठा संदेश अगदी मोजक्या घडीत बसवयाचा तर कुठे तरी काट छाट आलीच.महत्वाची बाब म्हणजे ह्या दोन्ही स्त्री व्यक्तिरेख्नावर अन्याय होत नाही.त्यांच्या भोवती खूप कथा अवलंबून राहते.
 सारीच पात्र आपली व्यक्तिरेखा धरून शेवट पर्यंत आपल्याला खिळवून ठेवतात.वेशभूषा,रंगभूषा आणि प्रकाशयोजनाही अनुरूप झाली आहे.चपखल ठिकाणी वापरलेली जुनी गाणी आणि योग्य चीज़ भावनाविवश करते.नाटक पाहून निघताना थोड़ी आसवे जशी डोळ्यात तरळतात तशीच कुठेतरी सृष्टीच चक्र वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टिही देतात.मला वाटत ह्यातच खर नाटकाच श्रेय सामावल आहे.
 एक नवा प्रयोग म्हणून हे नाटक पहायला आणि आयुष्याचा एक नवा वर्ग अनुभवण्यासाठी  तिकीट काढायला काहीच हरकत नाही.  

  

2 comments:

Sandeep Khandewale said...

waa! pranali :) chhan lihile aahes...

gunee... said...

Khoop Chhan. :)