Friday, January 6, 2012

मी कोण होणार?

चिनूला शाळेत वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा होता.  स्पर्धेचे विषय आधीच देण्यात आल्याने त्याच्याकडे तयारी साठी खूप वेळ होता. त्याचा विषय तर निवडून झाला होता - "मी  कोण होणार?"
    घरी, शाळेत, खेळताना सगळीकड़े त्याचा एकच शोध - खरच मला कोण व्हायच आहे? मला मोठ्ठ होऊन नाव, प्रसिद्धी आणि पैसे पण मिळवायचे आहेत. त्यासाठी मला डॉक्टर व्हायला हव का? नको त्यापेक्षा आपण एखादा मोठा नेता व्हाव. पण  सगळेच नेते काही चांगले  होत नाहीत. त्याना खूप  वाईट काम पण करावी लागतात मोठ व्ह्यायला. त्याना तर आपले बाबाच किती शिव्या घालतात. मग सचिन सारखा क्रिकेटर? का  एखादा scientist ? हम...एकदम APJ कलाम सारखे! मग नेता म्हणूनही कारकीर्द होईल आणि scientist पण....चला हा विषय चांगला आहे एकदम.
Bating  सोडून चिनू एकदम घरी पळत सुटला...ते थेट त्याच्या अभ्यासाच्या टेबल वरच जाऊन बसला. त्याने एकदम भाषण लिहायला सुरुवात केली. त्यात त्याने किती स्वप्न रंगवली. अगदी आपण आपल्या देशासाठी ह्याव करू नी त्याव. आपण scientist  झालो तर कसले शोध लावू त्याचा  अख्य्ख्या जगाला कसा फायदा होईल?  मग पुढे जर आपण राष्ट्रपती झालो तर देशात काय- काय  बदल घडवून आणू, असे सगळे विचार त्याने त्यात मांडायला सुरुवात केली. पण तरीही त्या सगळ्या गोष्टींचा त्याला मेळ घडवता येईना. मग त्याने ठरवल हयात बाबांना मदतीला घ्यायला काहीच हरकत नाही. बाबा भाषण लिहून देणार नाहीत म्हणाले तरीही मदत करणारच नाहीत अस नव्हते म्हणाले.

चिनू - बाबा मी भाषण थोड फार लिहिलय. पण त्यात जरा गोंधळ होतोय. त्याचा शेवट कसा करायचा हेच कळत नाहीये. आणि थोड़े मधले मुद्दे नीट ठसवता येत नाहीयेत.
बाबा - अरे भाषण लिहायला तर सुरुवात केलीस ना? मग जमेल हळू -हळू . बघू तरी चिरंजीवांना काय व्हायचय ते. हं...एकदम राष्ट्रपती का? आणि त्याधी तुम्ही शोध लावणार?
चिनू - हो बाबा. मी ठरवलय. दहावी नंतर मी science घेणार. आणि मग IUCAA मधे शिकणार. मला यंदा science मध्येच जास्त मार्क्स आहेत. सोप वाटत मला science. त्यात काहीच घोकमपट्टी नाहीये.
बाबा - बर. विचार तर चांगला आहे चिनू. पण समज जर तुला ह्यातल काहीच होता नाही आल तर?
बघ म्हणजे मला तुला नाराज नाही करायचय किंवा तू असा विषय वकृत्वसाठी लिहू नकोस असही माझ म्हणन नाहीये. पण मी आपल असच general एक curiosity म्हणून विचारतोय. पुढे मोठ्ठ होण म्हणजे तुला असच करियर असाव अस वाटत का?  दिवसात मिळेल तेवढा वेळ तुला क्रिकेट खेळायच असत, मग हे अचानक क्रिकेटर सोडून तू हे  काय बुआ लिहीलस असा आपला मला प्रश्न पडला.
चिनू - बाबा, मला पण अगदी असच वाटत होत. पण आज काल क्रिकेट टीम मधे प्रवेश पण मिळायला लागतो ना. नाहीतर मी आपला बसायचो २०- २० खेळत. मी खूप विचार केलाय. आणि क्रिकेट खेळतानाच मला अस वाटल हयात काही आपल खर नाही. आज-काल मला तर बंड्या पण आऊट करतो. मला नाही वाटत बाबा मी खरच चांगल क्रिकेट खेळतो. त्यापेक्षा हे scientist होण मला जमेल अस वाटत. शिवाय वर्गातली  अर्धी गँग तर मी क्रिकेटपटू होणार असच भाषण करणार आहे. मला स्पर्धेत नंबर नको का मिळायला?
बाबा - म्हणजे हे वकृत्व वगैरेसाठी तु अस काहीही लिहितोयेस? म्हणजे खरच तुला कोण व्हायचय हे नाहीच माहित? किंवा तसा विचार करावा अस तुला नाही वाटत? पठ्ठ्या आता आठवी मध्ये आहेस ना  तू?
चिनू - बाबा, तस नाहीये. म्हणजे मी नंबरच म्हणालो ते वेगळ होत. पण खरच मला scientist व्हायचय. मला नाही वाटत मला सचिन सारख नॉनस्टॉप खेळण जमेल. तुम्ही मला सांगा ह्या भाषणात मी कसे काय मुद्दे ठसवू?
बाबा - चिनू मला वाटत आधी तू ह्यावर नीट विचार कर. म्हणजे मग तुलाच समजेल कस लिहायच ते. खर तर मुद्दे तू दुस-याला तेव्हाच पटवून देऊ शकतोस जेव्हा तुला ते नीट समजतात. नाहीतर मग तू घोकमपट्टीच करणार भाषणाचीपण.
चिनू- बाबा, तस करायच होत तर मी पुस्तकातूनच भाषण घेतल असत ना? तस नाहीये मला खरच अस देशासाठी काहीतरी करायचय.
बाबा - ते मान्य. मग त्यासाठी तुला काय scientist  किंवा राष्ट्र्पतीच होण गरजेच आहे? तुला काय वाटत आम्ही देशासाठी काहीच करत नाही?
चिनू- नाही बाबा. अस नाही. पण जवान जे करतात ते वेगळ. किंवा आन्णा हजारे जे करतात ते वेगळ.
बाबा- बर. मग माझ्या प्रश्नांची आधी उत्तर दे. आन्णा हजारे काही करताहेत ते सगळ भ्रष्टाचाराविरोधी बरोबर?
चिनू- हो.
बाबा - त्यांची धडपड आहे ती आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी. आपल्याला भ्रष्टाचार करायला लागू नये  म्हणून.बरोबर?
चिनू- हो.
बाबा- मग समज. उद्या जर त्यांच लोकपाल बिल मान्य झाल आणि आपण सगळ्यानी भ्रष्टाचार थांबवलाच नाही तर? म्हणजे नाक्यावरच्या पोलिसाने उद्या एखाद्या माणसाने सिग्नल तोडला म्हणून पैसे घ्यायचे थांबवलेच नाहीत. आणि सिग्नल तोड़णा-याने शिक्षा मिळन्या पेक्षा थोडेसे पैसे देऊन सुटू म्हटल; तर थांबेल सगळा भ्रष्टाचार?
चिनू - अस कस बाबा? शक्यच नाही.
बाबा- म्हणजे नेमक  काय?
चिनू- म्हणजे आपण सगळ्यानी मिळून प्रयत्न करायला पाहिजेत.
बाबा- म्हणजे काय?
चिनू -सगळ्यानी जागरूक रहायला पाहिजे. केलेल्या नियमांच पालन केल पाहिजे.
बाबा - ह्यालाच तुम्ही नागरिक शास्त्रात काय म्हणता?
चिनू - देशाचा सुजाण नागरिक.
बाबा- हं. आणि ज्या देशात असे नागरिक नसतात त्या देशाला मग कोणी कितीही उपदेश केले तरी त्याचा काही उपयोग असतो का?
चिनू- नाही.
बाबा- मग आता मला सांग तुझे बाबा काहीच करत नाहीत देशासाठी?
चिनू-  मी तर नाही पहिल तुम्हाला कधी वाईट काम करताना. किंवा पैसे देताना आणि घेताना पण.
बाबा - बर. मग तुला पटतय तर की नुसता चांगला नेता बनणच म्हणजे देश  सुधारतो अस नाही, तर त्यातला प्रत्येक नागरिक हा सुजाण सुशिक्षित असण पण महत्वाच असत.
चिनू - बरोबर. पण बाबा, तरीही मोठ होउन मला काहीतरी करियर तर हवच ना. मग scientist काय वाईट आहे?
बाबा - अरे त्याला माझी काहीच हरकत नाहीये. पण मला समजत नव्हत तुला नेमक एवढच झाल की सगळ ठीक होईल अस का वाटत ते? खर तर तुला अजूनही नाही समजत आहे मोठ्ठ होण म्हणजे नेमक काय?
चिनू - बाबा...मला आधी एक जागरूक नागरिक व्हायचय. हे पटतय मला.
बाबा - चिन्या, पण त्यासाठी आधी काय असाव लागत?
चिनू - म्हणजे हो काय?
बाबा - अरे, उद्या तुला हव असणार करियर नाही मिळाल तर तू काय करणार? किंवा ते मिळाव म्हणून तू काय करणार?
चिनू- खूप मेहनत.  म्हणजे मग हार मनावीच नाही लागणार.
बाबा- आणि तुझी मेहनत कमी पडली तर?
चिनू - बाबा असहो काय विचारता?
बाबा- हं. काय करणार आजच तू म्हणालास तुझ्यापेक्षा बंड्या चांगला खेळतो हल्ली म्हणून. त्याचा अर्थ काय?
चिनू - मी practice मध्ये  कमी पडतोय.
बाबा- मग अस जर झाल तर तू पुढे कसा मोठा होणार? असा जर तू घाबरायला लागलास तर तुला हव ते नेमक कस मिळेल? तू जर मधेच सगळे निर्णय बदलायला लागलास तर कसा मोठा होशील?
चिनू- चिकाटी पण हावी, मेहनती बरोबर.
बाबा - आणि हे सगळ करताना वाटेत हजारो आमिष येतील. म्हणजे, कोणी shortcut घेउन
येतील. अमुक करण्यासाठी एवढच करा. एखाद्या विद्यापीठात management सीट घ्या. किंवा एखाद्या प्रध्यापकाचा क्लास लावा. हे सगळ केलस  तर जमेल?
चिनू- बाबा, तुम्ही पण ना. आज-काल चांगला क्लास महत्वाचा आहे. आणि management   सीट शिवाय कुठे जास्त सीट्स ओपन साठी असतात?
बाबा - म्हणजे तू वेळ अली तर असे मार्ग घेणार?
चिनू - बाबा, ताईलाच बघा ना मेडिकल ची admission नाही मिळाली, म्हणून pathology करावी लगतेय.
जर आपण पैसे भरले असते तर आज आपली ताई नक्कीच डॉक्टर झाली असती.
बाबा - चिनू, मी तेच तर म्हणतो आहे. आपण सगळ्यानीच अस केल तर मग बदल होतील का? असे मार्ग अवलंबले तर होईल का सुधारणा? जर आहेत त्याच सीट्स मोकळ्या राहिल्या तर कोणी पैसे मागतील का?
चिनू - पण बाबा, हे म्हणजे...
बाबा - आपण बोलू ह्यावर नंतर. मला आधी सांग उत्तम नागरिक व्ह्यायला नेमक काय असाव लागत?
चिनू - मला नाही समजत आहे.
चिनू- अरे बेटा, सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण एक उत्तम माणूस असण महत्वाच नाही का? जर आपली मूल्य, संस्कार नीट नसले तर आपण उत्तम नागरिक कसे होणार? जर आपण घरातल्या वडिलधा-यांनाच मान नाही देऊ शकलो तर बाहेर कसा देणार एखाद्या तिस-या व्यक्तीला?
चिनू- हो. हा तर मी विचारच नाही केला? जर प्रत्येकानेच असा विचार केला तर किती सोप आहे सुधरणा व्हयायला.
बाबा - मग हा विचार सगळ्यात महत्वाचा आहे ना?
चिनू- हो. नाहीतर मग अगदी कोणी उत्तम खेळाडू असला काय किंवा शिक्षक असला काय जर तो एक चांगला माणूस नसेल तर त्याच्या क्षेत्रात गोंधळच घालणार. आपल काम तो चोखंदळपणे  करणारच नाही.
बाबा- मग हेच तर मी तुला सांगतो आहे. कुठलही काम चांगल करण ह्यावरच तर तुमची ऊंची अवलंबून असते ना? आज तुला कलाम चांगले वाटतात त्याच कारण? आपल्या सगळ्याना वाटत सचिन चांगला खेळतो. तोच जर match - fixing करायला लागला तर जमेल त्याला चांगल खेळायला?
चिनू- हा तर मी विचारच नाही केला.
बाबा- मग आता मला सांग तुला काय व्हायचय?
चिनू- बाबा, मला करियर म्हणून काय निवडायचय हे जरी माहित नसल ना तरी मला माहीत आहे की "मला एक चांगला माणूस व्हायचय. जो नुसता डिग्री मिळवून  educate नाही होणार तर उत्तम मूल्यांनी परिपक्व असेल. ज्याच्याकडे उत्तम संस्कार आणि प्रमाणिकपणा असेल. वेळ आली तर तो त्याला पटकन मिळणारे वाम मार्गावरील फायदे सोडेल, पण चांगले मार्ग नाही."
बाबा - झाल तर मग. आता तुला वकृत्व स्पर्धेत भाग घायला हरकत नाही. आणि मुद्दे ठासवून सांगायलाही....















7 comments:

gunee... said...

मी कोण होणार?
Interesting.

Since I was in Jr. College I couldn't find this answer.
Shinde Sir used to ask this question multiple times but I really never bothered to think on it and even today I don't have any answer.

Thanks for reminding me the same.

pranali said...

I guess this is a wake up call then :) I'm in search of same answer...

Shubhada said...

I remember one incidence when we were in 2nd standard and DALVI sir asked everyone..one q that was same question you have written blog for it.
After asking everyone he said all of you disappointed me ..not a single student gave me ans that he/she will become good human being. He sow thought in my mind and heart.
I like the way you narrate this story. Keep your good work alive.

pranali said...

Thanks Shubhi :)

Sanil said...

truly inspiring!!!
Thanks a lot for this wonderful thought :)

pranali said...

@sani - I am waiting for your implemntation! Don't break signals and give *** to police to come out of it!

Unknown said...

I am in 9th std now. This is surly going to help me in future. चिनु आणि त्या चे बाबा यांना