Sunday, September 12, 2010

गांधारी एक जीवनप्रवास!

गांधारी म्हटल की साधारण आपल्या समोर उभी राहते ती डोळ्याला शुभ्र वस्त्र बांधणारी स्त्री जिने वस्तुतः आंधळेपण स्वीकारल. जिने खूप मोठा त्याग केला सृष्टी अनुभवण्यचा आणि इतराना दृष्ट असण्याचा आभास निर्माण करण्याचा . कारण तर अगदीच क्षुल्लक - राजेसाहेब आंधळे होते. आजकाल कोणालाही ही गोष्ट हास्यास्पद वाटेल; परंतु त्यामागे उभी असणारी गांधारी मात्र एक स्वतंत्र यक्तिमत्त्व म्हणून भावण्याजोगी आहे खरी . ती कुठेही परावलंबित किंवा भित्री व्यक्ती म्हणून वावरत नाही . अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही स्वतंत्र छठा उमटवून जाते . म्हणूनच एक तत्वनीष्ठ स्वतंत्र व्यक्ती म्हणून भारतीय संस्कृतींत ह्या स्त्रीचा गौरोवोच्चार अपरिहार्य ठरतो.
एक भारतीय स्त्री म्हणून कुठेही आपल शील सोडत नाही अथवा कधीही आपल्या पतीस त्याच्या कुकर्मापासून परावृत्त करण्यास विसरत नाही . एक माता म्हणून, एक पत्नी म्हणून अथवा एक राज्ञी म्हणून तिने आपला धर्म अतिशय कर्तव्यदक्षपणे निभावाला. तिने सतत पुत्रांना, भावाला अणि पतीला एक मनुष्य म्हणून भानावर आणण्यासाठी प्रयत्न केले . कुठेही खचून न जाता तिने आपल्या पुत्रांना शासन सुनावले, अगदी आशीर्वांदापासूनही त्यांना अखेरपर्यंत वंचित ठेवले . कोणती माता हे करु शकेल? स्व पतीलाही न जुमानता जेव्हा त्याच्या दुष्क्रुत्याचा पाढा वाचायची वेळ येते तेव्हा ती निशंक आणि तटस्थ व्यक्ती म्हणून समोर येते . हीच गांधारी त्याला अखेरच्या क्षणाला एक पत्नी म्हणून आणि माता म्हणून अश्रु पुसण्यासाठी आपल्या पतीसमोर येते, पुत्रवियोगाच्या दुःखाने झालेली अगदी असह्य आणि कारुण भासते. तिची माया, प्रेम आणि क्रोध शेवटच्या पर्वात हुरहुर लावून जातात. स्वलोकांना कंटाळलेली स्त्री शेवटी आपला सगळा क्रोध, मत्सर आपल्या भगवंतावर काढ़ते आणि एक शापाचा वाली म्हणून अमर होते . वस्तुस्थिती पारदर्शकपणे पाहिल्यास आपल्यालाही जाणीव होते की तीच्या जवळच्या व्यक्ती किंवा प्रसंग तिच्या हातात नव्हते. आलेल्या प्रसंगांना ती मोठ्या धैयॉने सामोरी जाते . कुठूनही पलायनवाद करत नाही. नाहीतर ती केव्हाच आपल राज्य सोडून तिला माघारी घेऊन जाण्यासाठी आलेल्या शकुनीसोबत परत गेली असती . आपल मनालेल्या घरी मोठ्यांच्या सन्मानाकारिता तिने स्वखुशींचा खूप विचारपूर्वक त्याग केला . सगळ्यात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तिने कधीही आपल्या निर्णयाचा त्रागा केला नाही अथवा आपल्या नशिबालाही दोष दिला नाही . "कर्मण्ये वाधिकरास्तेषु मा फलेषु कदाचन। " ह्या ऊक्तीप्रमाणे तिने आपला जीवनप्रवास सुरु ठेवला . आणि म्हणूनच शापीत भगवंतालही तिच्याकडे उशाःप मागण्याचे धेर्य करता आले नाही. अशीही ही गांधारी एक स्त्री म्हणून एक अदभुत शिखर गाठते.

3 comments:

Amit said...

Barach divsani ek changla post vachayla milala :)Thanks ..
Anyway kuthle pustak vachates..?Achanak Gandhari ka aathavli?

pranali said...

Achanak nahi. she is one of my favourite character from mahabharat.Did not get any book on her as of now to read. But thanks to siddha for gifting me entire mahabharat show-which inspired me.

Unknown said...

बिचारी गांधारी, पती अंध आहे म्हणून बिचारीनं आयुष्यभर आंधळेपण स्वीकारलं!! केवढी मोठी पतिव्रता!! पण नाही!! तिनं शहाणपणा केला असं म्हणता येईल का?? तिनं डोळ्यांवर पट्टी बांधली म्हणून काय थोडंच पतीला डोळसपण येणार होतं?? उलट दोघेही अंध झाले!! आयुष्यभर आंधळा संसारच केला त्यांनी!! छे ! चुकलंच तिचं ! तिला काय अधिकार होता नवर्यासाठी आंधळेपण स्वीकारायचा ? ती काय फक्त पत्नी होती ? शंभर पुत्रांना जन्म देणारी माता होती ती !
"नाही बये ! नाही ! अगं, मातेला अंधत्व स्वीकारून कसं चालेल ? पुरुष आंधळा निघाला म्हणून स्त्रीनं जाणूनबुजून अंधत्व घ्यायचं नसतं! जगन्माता जननीनं जर आंधळेपण स्वीकारलं तर उद्याच्या पिढीचं काय होईल ? मग सुयोधनाचा दुर्योधन व्हायला वेळ लागत नाही. आणि मग मिटल्या डोळ्यांनीच पुत्रांचे अध:पतन पाहत बसावं लागतं !